NPS वात्सल्य योजना: मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारची भन्नाट योजना

केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘NPS वात्सल्य योजना’ नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना पालकांना त्यांच्या मुलांच्या पुढील आयुष्यासाठी बचत करण्यास आणि पेन्शन खाते उघडण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ देते.

या योजनेत, पालकांना बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसद्वारे ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा दिली जाते. खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपयांचे योगदान आणि त्यानंतर दरवर्षी किमान 1000 रुपये जमा करणे आवश्यक आहे.

हे हि वाचा : लाडकी बहीण योजना यादीत तुमचं नाव तपासा

मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण होताच, खाते नियमित एनपीएस योजनेत रूपांतरित केले जाईल. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ही योजना लागू करेल.

NPS वात्सल्य खाते कोण उघडू शकते?


पालक 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी NPS वात्सल्य खाते उघडू शकतात. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर, हे खाते नियमित NPS योजनेत रूपांतरित केले जाईल आणि मुलगा/मुलगी वयाच्या 60 वर्षापर्यंत त्याच खात्यावर पेन्शन काढू शकेल. NPS ने विविध गुंतवणुकीतून (इक्विटी, डेट सिक्युरिटीज, G-Sik) अनुक्रमे 14%, 9.1% आणि 8.8% परतावा दिला आहे.

NPS वात्सल्य योजनेच्या अटी:

  • 18 वर्षांपर्यंतची सर्व मुले या योजनेसाठी पात्र आहेत.
  • हे खाते फक्त मुलांच्या नावाने उघडले जाईल आणि तेच या योजनेचे लाभार्थी असतील.
  • खाते सर्व बँका, पोस्ट ऑफिस किंवा ई-एनपीएस द्वारे उघडले जाऊ शकते.
  • खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपयांचे योगदान आवश्यक आहे.
  • गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.
  • खात्यात जमा केलेली रक्कम चक्रवाढ व्याजासह वाढेल.
  • तीन वर्षांनंतर, शिक्षण किंवा आजारपणासाठी 25% पैसे काढता येतात.
  • मुलाच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत जास्तीत जास्त तीन पैसे काढण्याची परवानगी आहे.
  • 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत ही योजना काढता येणार नाही.

Leave a Comment

WhatsApp सरकारी योजना ग्रुप