लाडका भाऊ योजना: अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ‘लाडका भाऊ’ योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान या योजनेची घोषणा केली, बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य आणि कौशल्य प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे. राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळेल. योजनेनुसार, अर्ज करणाऱ्या तरुणांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा:

  1. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करा.
  2. नवीन वापरकर्ता नोंदणी: वेबसाइटवरील ‘नवीन वापरकर्ता नोंदणी’ वर क्लिक करा.
  3. अर्ज भरा: त्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल. तुमचे नाव, पत्ता, वय आणि इतर वैयक्तिक तपशीलांसह ते काळजीपूर्वक भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: अर्ज भरल्यानंतर, त्यात नमूद केलेले आधार कार्ड, बँक खाते तपशील इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज सबमिट करा: सर्व माहिती आणि कागदपत्रे भरल्यानंतर, ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. त्यानंतरच तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

पात्रता:

  • वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • कौशल्य प्रशिक्षण घेत असताना 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, ITI विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये मिळतील.

दरवर्षी राज्यातील 10 लाख तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment

WhatsApp सरकारी योजना ग्रुप