लाडकी बहीण योजनेचे खात्यावर किती पैसे जमा होणार

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजने’ अंतर्गत पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत लाखो महिलांनी अर्ज केले असून दोन लाखांहून अधिक महिलांना सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचा लाभ 29 सप्टेंबर 2024 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

योजना सुरू झाल्यापासून, राज्यभरातील महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत आणि त्यांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत. या योजनेत अद्याप नावनोंदणी न झालेल्या महिलांसाठीही चांगली संधी आहे. महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज कसा करायचा?

ज्या महिलांनी ‘लाडकी बहिन योजने’अंतर्गत अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्जासाठी संबंधित महिलांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांचे आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील आणि इतर आवश्यक माहिती सादर करावी लागेल.

महत्वाचे मुद्दे:

  • दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होतील.
  • तिसरा हप्ता २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.
  • महिलांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करावे

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असून या योजनेचा लाभ झालेल्या महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Comment

WhatsApp सरकारी योजना ग्रुप